मध्य रेल्वेच्या आकुर्डी, चिंचवड स्टेशनदरम्यान मेगाब्लॉक
भुसावळ :– मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये तांत्रिक ब्लॉक आणि नॉन इंटर लॉकिंग चे कार्य करीत असल्यामुळे दि 9 जूनला विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही मेल व एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आलेला आहे .
गाड़ी क्रमांक 11025 अप भुसावळ पुणे हुतात्मा एक्सप्रेस दिनांक 9 जून ला सुटणारी गाड़ी मनमाड दौड़ मार्गाने वळविण्यात आली असून पुणे स्टेशनला पोहचेल.
मेगाब्लॉक सकाळी ७ वाजेपासून दुपारी १ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. तसेच पुणे, शिवाजी नगर येथून सुटणाऱ्या तळेगाव, लोणावळा, पनवेलकडे जाणाऱ्या लोकल तसेच पॅसेजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.