टोरेओन (मेक्सिको)- रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये एमर्जन्सी लँडिंग दरम्यान प्रवासी विमानाला लागलेल्या आगीत 41 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये एक खासगी प्रवासी विमानालाअपघात झाला आहे.या अपघातामध्ये 14 जण ठार झाले आहेत.
बम्बार्डियर चॅलेंजर 601 जेट विमान रविवारी संध्याकाळी लास व्हेगासपासून मोनेटेरीला जात असताना या विमानाचा अपघात झाला. विमान उत्तर मेक्सिकोतील कोहाउइला प्रांतातून जात असताना या विमानाचा हवाई वाहतुक नियंत्रण केंद्राशी संपर्क तुटला होता. त्यानंतर या विमानाच्या शोधाची मोहिम सुरू झाली. या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष आढळून आले. हे अवशेष बऱ्याच मोठ्या भूभागात विखरूलेले होते. त्यामुळे बेपत्ता झालेले विमान हेच आहे का हे पडताळून पहावे लागले, असे मोन्क्लोव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रमुख मिग्युएला विल्लरेल यांनी सांगितले. या विमानामध्ये 11 प्रवासी आणि 3 कर्मचारी होते. हे विमान कोसळण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.