मृत्यूवर विजय मिळण्यासाठी मृत्यु महोत्सव

0

दिगंबर जैन मुनिश्री यांची यम सल्लेखना सुरू

खान्देशातून शेकडो भाविक दर्शनार्थ रवाना

पारोळा (प्रतिनिधी) : ख्याती प्राप्त दिगंबर जैन तपस्वी महामुनी श्री चिन्मयसागरजी (जंगल वाले) महाराज यांची प्रकृती ( स्वास्थ )बऱ्याच दिवसापासून ठीक नसल्यामुळे शरीर साथ देत नाही त्यावेळेस जैन तत्वज्ञान नुसार सल्लेखना ( अर्थात संथारा ) घेत असतात. त्यांनी ही नियम सल्लेखना 19 सप्टेंबर रोजी गुरुवारी आचार्य श्री विद्यासागर जी महाराज यांच्या मंगल आशीर्वादाने मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी मृत्यू महोत्सवास जूगूल या गांवी आचार्य शांतिसागरजी आश्रम येथे सुरू केले आहे पुज्य श्री दहा वर्षापूर्वीच शिरपूर येथे आले असता विजय बाफना यांनी सकल जैन समाजातर्फे भव्य स्वागत करण्यात आले होते . त्यांचे स्मरण ठेवून त्यांचे दर्शनार्थ खानदेशातून सकल जैन समाज रवाना झाल्याची माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धीप्रमुख सतीश वसंतिलाल जैन कुसुंबा यांनी दिले.

आचार्य विद्यासागर विद्यासागर जी महामुनी श्री यांचे परमशिष्य जंगलवाले बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले चिन्मय सागर जी महाराज घनदाट जंगलात चातुर्मास करतात त्यांनी दिनांक 12 ऑक्टोंबर शनिवारी रोजी सर्व प्रकारचे आहाराचे त्याग करून सर्व प्राणी मात्रांचे क्षमा मागून मृत्यू महोत्सवात सक्षम झाले त्यांच्या या मृत्यू महोत्सवात सफलतेचे साठी सदैव चार दिगंबर जैन मुनिश्री व एक ब्रह्मचारी भैय्याजी असे सदैव धार्मिक संबोधण्यासाठी तत्पर आहेत त्यांच्या दर्शनासाठी प्रतिदिन हजारो भक्त महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश छत्तीसगढ गुजरात दिल्ली पश्चिम बंगाल छत्तीसगड बिहार गोवा आदी राज्यातून येत आहेत जंगलवाले बाबा यांना 2015 मध्ये अमेरिका ज्वेल ऑफ इंडिया 2014 मध्ये लंडने महात्मा गांधी सन्मान 2013 मध्ये श्रीलंका अमेरिका लंडन येथील युनिव्हर्सिटी ने डी लिट उपाधी दिली पुज्यश्रीनी अनेकांना व्यसनापासून मुक्त केले मांसाहार त्याग केला वृक्षरोपण नशामुक्ती जल संग्रह आदि कार्यप्रणालीवर जोर दिला .

Leave A Reply

Your email address will not be published.