मुस्लिमांनी शेवटच्या क्षणी काँग्रेसला मतदान केलं : केजरीवाल

0
20

नवी दिल्ली :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाआधी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. दिल्लीत मुस्लिमांनी शेवटच्या क्षणी आम्हाला मतदान करण्याऐवजी काँग्रेसला मतदान केलं. मुस्लिम मते काँग्रेसकडे सरकली नसती तर आम्ही दिल्लीतील सातही जागांवर विजयी झालो असतो, असा दावा केजरीवाल यांनी केलाय.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अरविंद केजरीवाल यांनी हा दावा केलाय. आम आदमी पार्टी सातही जागांवर विजयी होईल असं आम्हाला मतदानाच्या ४८ तास आधी वाटत होतं. मात्र ऐनवेळी मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला मतदान केलं. नेमकं असं का झालं हे जाणून घेण्याचा आम्हीही प्रयत्न करत आहोत, असं केजरीवाल यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here