मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांचा तालुक्यात सत्कार

0

फैजपूर | प्रतिनिधी

यावल तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी   माध्यमिक विद्यालय वड्री   चे मुख्याध्यापक जयंत  रमेश चौधरी यांची सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा तालुक्यामध्ये ठीक ठिकाणी सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ महाजन यांच्या निवासस्थानी शरद महाजन यांच्या हस्ते शाल  व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिल लढे, सेक्रेटरी हर्षद महाजन, दूध उत्पादक सहकारी संस्थेचे चेअरमन नितीन चौधरी, ललित फिरके सर  उपस्थित होते. जी के विद्यालय आमोदा येथे मुख्याध्यापक संजीव बोठे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच  मारूळ च्या अॅगलो उर्दू विद्यालयांमध्ये मुख्याध्यापक  सय्यद मसर्रत अली   यांनी सत्कार केला . मारुळ च्या आयडियल उर्दू विद्यालय मध्ये संस्थेचे चेअरमन  सय्यद बशारत अली  यांनी सत्कार केला. प्रसंगी मुख्याध्यापक शेख अशपाक व सहकारी उपस्थित होते .डांभुर्णी येथील  डी के चौधरी माध्यमिक विद्यालयांमध्ये मुख्याध्यापक उमाकांत महाजन यांनी सत्कार केला.माध्यमिक विद्यालय  वड्री येथे चेअरमन  विलास चौधरी यांनी सत्कार केला.शाळेचे शिक्षक के जी चौधरी,जितु सर, सुरेश पाटील,प्रशांत चौधरी व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.न्हावी येथील शारदा माध्यमिक विद्यालयांमध्ये मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता पाचपांडे यांनी सत्कार केला.तसेच जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी  चे सचिव मनोहर सूर्यवंशी ,बाबा सोनवणे, दत्तू साळवे ,मिलिंद जावळे यांनी सुद्धा सत्कार केला .त्याचप्रमाणे यु डी दादा यांनी सुद्धा सत्कार केला. यावल चे गटशिक्षणाधिकारी नईम शेख ,  साकळी येथील शारदा माध्यमिक विद्यालयाचे प्रमोद जोशी ,पी एस बोरसे, मुख्याध्यापक गिरीश पाटील ,यांच्यासह प्रसन्ना बोरोले, योगेश इंगळे, जयदीप फेगडे, दिपक टोके,धनु नेहेते,प्रवीण वारके यांच्यासह अनेक शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.