मुख्याध्यापक, शिक्षकांना शाळा प्रवेशास मज्जाव!

0

आर.आर. शाळेतील प्रकार : जिल्हापेठ पोलिसात देघांविरुद्ध गुन्हा
जळगाव-

शहरातील रावसाहेब रुपचंद (आर.आर) शाळेच्या प्रवेशद्वारावर मुख्याध्यापक डी.एस. सरोदे यांच्यासह शिक्षकांना गावगुंडांनी अडवून अरेरावी केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी मुख्याध्यापक डी.एस. सरोदे यांनी जिल्हापेठे पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हे गावगुंड संचालक अरविंद लाठी यांनी पाठविले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शुक्रवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास श्री. सरोदे व अन्य शिक्षक शाळेत प्रवेश करीत असताना त्यांना प्रवेशद्वारावर दोन तरुणांनी अडवून शिवीगाळ करीत शाळेत येण्यास मज्जाव केला. शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेला हा प्रकार शिक्षणक्षेत्राला काळीमा फासणारा आहे. प्राप्त माहिती अशी की, आज दि. 15 जून शाळेचा पहिला दिवस असल्याने मुख्याध्यापक डी.एस. सरोदे यांच्यासह 68 शिक्षक शाळेत प्रवेश करीत असताना त्यांना प्रवेशद्वारावर दोन अज्ञात तरुणांनी अडवित अध्यक्ष अविंद लाठी व सचिव मुकुंद लाठी यांनी आपणास शाळेत शिरण्यास मनाई केली असे म्डत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. काही विद्यार्थी शाळेत प्रवेश करीत असताना त्यांनीही मज्जाव करण्यात आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. संस्थेचे अध्यक्ष अरविंद लाठी, सचिव मुकुद लाठी यांनी शाळेचे मागील प्रवशद्वाराला कुलूप लावून ठेवले आहे. या प्रवेशद्वारातून शिक्षकांना प्रवेश देण्यात येतो, हे दार बंद असल्याने शिक्षकांनी मुख्य प्रवेशद्वाराकडून प्रवेश केला असता त्यांना तेथे उपस्थित असलेल्या दोन तरुणांनी धक्काबुक्की करीत मारहाण केली.
विद्यार्थ्यांचे स्वागत… अन् दिली तक्रार
मुख्याध्यापक डी.एस. सरोदे व शिक्षक-शिक्षिकांनी शाळेत प्रवेश करुन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेचा पहिला दिवस साजरा झाल्यानंतर सर्व शिक्षकांनी थेट जिल्हापेठे पोलीस स्टेशन गाठूण धक्काबुक्की केलेल्या दोन्ही तरुणांविरुद्ध तक्रार दिली. बर्‍याच वेळ तक्रार घेतली जात नसल्याने शिक्षक पोलीस ठाण्यात थांबून होते. मुख्याध्यापक श्री. सरोदे यांच्या फिर्यादीवरुन अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.
संचालकांचा वाढला त्रास
संस्थेचे संचालक अरविंद लाठी, मुकुंद लाठी हे शिक्षकांना सातत्याने त्रास देत असून त्यांच्या त्रासाने संस्थेच्या लौकीकाला काळीमा फासला जात आहे. मागे लाी बंधूंनी शाळेचे गेट व पाणी पुरवठा बंद करुन विद्यार्थ्यांना देखील त्रास दिला होता. वरिष्ठांनी याकडे लक्ष देवून कारवाई करावी अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.

शिक्षकांकडून वॉचमनला मारहाण
मुख्याध्यापक सरोदे यांना संस्थेने बडतर्फ केले आहे. तसेच याबाबत संस्थेने उपसंचालकांकडे पत्र दिले आहे. सरोदे यांना शाळेत येण्याबाबत कुठलीही परवानगी नाही. तरी देखील ते आज सकाळी येत असल्याने वॉचमनने त्यांच्याकडून परवानगी मागितली. वॉचमनने त्यांना येवून दिले नसल्याने सरोदे यांनी शिक्षकांना फोन केला. व त्यानंतर शिक्षकांनी वॉचमनला मारहाण केली. वॉचमनने शिक्षकांविरुध्द तक्रार दिली आहे.-
अरविंद लाठी
संस्थाध्यक्ष, ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी

व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लीक करा

Leave A Reply

Your email address will not be published.