मुख्याध्यापक पदावरून पुन्हा संभ्रम कायमच

0
 जामनेर शिक्षणसंस्थेतील वाद;फटका मात्र विध्यार्थ्यांना
 जामनेर(प्रतिनिधी):-तालुका शिक्षण संस्थेतील दोन गटांमधील वादाचा फटका शाळेलाच बसु लागल्याने प्रभारी मुख्याध्यापकपदावर कोणास नेमावे यावरूनही दोन्ही गटामधे अजुनही एकमत होत नाही. विद्यमान प्रभारी मुख्याध्यापक बि आर चौधरी यांनी परस्पर शाळेची रद्दी विकुन टाकल्याप्रकरणी त्यांचेसह ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तत्पुर्वी बि आर चौधरी यांनी अर्जीत रजा (अनीच्छीत कालावधी) टाकल्यामुळे आपो-आपच त्यांच्याकडील भार अन्य वरीष्ठ शिक्षकाला द्यावा लागेल,मात्र तसाही सु-स्पष्ट आदेश शिक्षण विभागाकडुन प्राप्त झालेला नसल्याचे सुत्रांनी सांगीतले.
*दोन दिवसात शिक्षणविभागाचे दोन आदेश*          मुख्याध्यापक बि आर चौधरी यांनी बेमुदत रजा टाकल्यानंतर एवढ्या मोठ्या शाळेला प्रभारी का होईना मुख्याध्यापक पद तात्काळ प्राप्त व्हायला पाहीजे होते,मात्र संस्थेतील वाद आणी सेवाजेष्ठता यामधेच घोळ सुरू असुन यात शिक्षण विभागाचीच कसोटी लागणार असल्याचे दिसते.गेल्या ३ जानेवारी रोजी ईतर दोघा-तीघा वरीष्ठ क्रमांक असलेल्यांकडुन लेखी होकार अथवा नकार मिळाला नसल्याने चवथ्या क्रमांकावर असलेले उपशिक्षक सुरेश पांडुरंग महाजन यांच्या नावाचा लेखी आदेश (३० जानेवारी पर्यंतचा) जिल्हा माध्यमीक शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वाक्षरीनिशी काढला होता.त्याचवेळी शिक्षणसंस्थेने सुरेश पांडुरंग महाजन यांच्या वर्तनुकीबाबत  शिक्षण विभागाला कळवीले की श्री महाजन यांना शालेय शिस्तीचे पालन करणेबाबत यापुर्वी वेळोवेळी सुचीत करण्यात आलेले असुन सुध्दा त्यांच्या वर्तनुकीत कुठलाही बदल झालेला नाही. त्यांचेकडुन अजुनही अरेरावी व शिवराळ भाषेत बोलण्याचे प्रकार सुरूच आहेत,त्यांच्याकडे प्रभारी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार राहील्यास शाळेचे वातावरण दुषीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याचे निदर्शनास आणुन दिले आहे.प्रस्तुतप्रकरणी प्रभारी मुख्याध्यापक श्री महाजन यांच्याबाबत तक्रार प्राप्त असल्याने मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरीषद जळगाव यांनी ४ जानेवारी रोजी समक्ष दिलेल्या सुचनेनुसार ३ जानेवारीचा लेखी आदेश रद्द करण्यात आला आहे.शंभरी पार करणाऱ्या न्यु ईंग्लीश शाळेसाठी ही शोकांतीकाच म्हणावी लागेल की सुमारे ५ हजारावर विद्यार्थी संख्येला संस्थेतील वादामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्यातरी मुख्याध्यापक मिळत नाही याचीच चर्चा शिक्षणक्षेत्रासह पालकवर्गात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here