मुख्यमंत्र्याना काळे झेंडे दाखविणाऱ्या पाडळसरे धरण संघर्ष समितीच्या सदस्यांना अटक

0

अमळनेर :– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहे. उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ दुपारी अमळनेर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान मुख्यमंत्री यांना पाडळसरे धरण संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यानी पाडळसरे धरण झालेच पाहिजे! या मागण्याचे फलक घेत घोषणा देत अचानक मुख्यमंत्री यांच्या गाड्यांसमोर येऊन निदर्शने केल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. तर गटागटाने निदर्शने करण्याच्या तयारीत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी पाळत ठेवून रोखुन धरले होते.

पाडळसरे धरणाचे काम मागील २० वर्षांपासून रखडलेले आहे. सत्तेत येण्यापूर्वी धरणपूर्तीचे आश्वासन देणाऱ्या सरकारने साडेचार वर्षात धरणास निधी उपलब्ध करून दिला नाही.जिल्ह्यातील असूनही जलसंपदा मंत्री यांनी धरणाकडे,आणि धरणाचं प्रदीर्घ काळ चाललेल्या आंदोलनाकडे उपोषण, जेलभरो,जलसत्याग्रहाकडे दुर्लक्ष केल्याने जनतेच्या भावना संतप्त आहे.मुख्यमंत्री यांना भेटून अमळनेरसह ६ तालुक्यातील जनतेच्या धरणाचे निवेदन जनआंदोलन समिती देणार होती. मात्र पोलिस प्रशासनाने एक दिवस आधीच समितीला कोणतेही आंदोलन,निवेदन देणेचे प्रयत्न करू नये,आंदोलन टोपी घालू नये! असे सांगितले होते.त्यामुळे मुख्यमंत्री यांच्यापर्यत धरणाचे प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देणेसाठी जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते प्रा.शिवाजीराव पाटील, रणजित शिंदे,महेश पाटील,देविदास देसले,नामदेव पाटिल,सतिष काटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रतापमिल मधिल रस्त्यावर एक एक करून रस्त्याच्या बाजूला आले. मुख्यमंत्र्यांना धरणाचे फलक व काळे झेंडे दाखवत अचानकपणे मुख्यमंत्री यांच्या ताफ्यासमोर प्रकट झाले.’पाडळसरे धरण झालेच पाहिजे!”,”धरण आमच्या हक्काचं”या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.अचानक झालेल्या आंदोलन कर्त्यांचा या निदर्शनानी सतर्क असलेले पोलिसानी आंदोलकांना रस्त्याच्या बाजूला रेटण्याचा जोरदार प्रयत्न केला.तर आंदोलकानी धरणाची मागणी यावेळी जोरदारपणे लावून धरली. पाडळसरे धरण तातडीने पूर्ण आमच्या परिसरासाठी अत्यावश्यक आहे या प्रश्नाकडे मुख्यमंत्री यांनी लक्ष द्यावे या उद्देशानेच आम्ही आंदोलन केले असे यावेळी संघर्ष समिती चे प्रा.शिवाजीराव पाटील यांनी सांगितले. तर “हि निवडणूक धरणाची व रस्त्यांची नाही असे महायुतीच्या मागील मेळाव्यात जलसंपदा मंत्री यांनी सांगितल्याने समितीचा भ्रमनिरास झाला! असे समिती रणजित शिंदे यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी कडे करून रोखुन धरले तात्काळ प्रतिबंधात्मक अटक करून पोलीस गाडीत टाकत सभास्थळा मार्गाहून घेऊन गेले. तर पाडळसरे धरण संघर्ष समितीचे सुभाष चौधरी यांचेसह अजयसिंग पाटील, रविंद्र पाटील, सुनिल पाटील, सतिष पाटील,सतिष पाटिल,रामराव पवार,सुपडू बैसाणे,डी.एम.पाटिल,आर.बी.पाटिल आदीना निदर्शनात्मक हालचाल करण्यापूर्वीच पोलिसांनी मुख्यमंत्री यांचा ताफा निघत असताना जागेवरच रोखून धरले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.