पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यातील कार्यरत असलेले व सेवा देत असलेले शासनमान्य सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेनेने पारोळा तहसीलदार अनील गवांदे व आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांना निवेदन देऊन यांच्या मार्फत माहाराष्ट्रा चे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे याच्या कडे दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.
लॉक डाऊन काळामध्ये बंद केलेले सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय सुरू करुन वाचन चळवळ अविरतपणे सुरू राहावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. तालुक्यातील सर्व ग्रंथालयीन पदाधिकारी व प्रमुख यांनी दुजोरा दिलेला आहे. गावा गावातील तरुण रोजगारासाठी कामानिमित्त बाहेर गावी गेले होते ते परत गावात आले आहे. ग्रंथालय प्रमुखांकडे येऊन वाचन सामग्रीची मागणी करत आहेत. वाचन चळवळ जिवंत ठेवण्यासाठी वाचनालय सुरु करावी राज्य सरकारने कोविड१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत तरी ज्या गावांमध्ये कोरोना प्रादुर्भाव झालेला नाही व कोरोना बाधित व्यक्ती निदर्शनास आलेला नाही अशा गावी ठिकाणी शासनाचे नियम सोशल डिस्टन्स ठेवून ग्रंथालय वाचनालय पूर्ववत सुरू करण्याची परवानगी शासनाने द्यावी, अशी मागणी पारोळा तालुका ग्रंथालय सेनेकडून करण्यात आलेली आहे.
यावेळी जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष सतीश पाटील, तालुका उपाध्यक्ष किशोर पाटील, सरचिटणीस सुनील देवरे, कार्यकारी सदस्य शिवाजी पाटील यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.