मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शहर सजले

0

भुसावळ (प्रतिनिधी)- माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराने झालेले निधन व राज्याला बसलेला अतिवृष्टीचा तडाखा यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली होती. भुसावळ येथे २३ रोजी महाजनादेश यात्रा येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुपारी ३ वाजता डी.एस. ग्राऊंडवर जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, महाजनादेश यात्रेच्या पृष्ठभूमीवर रविवारी भाजपा पदाधिका-यांनी नियोजन बैठक घेतली होती. यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यासह शहर भाजपामय करण्याचा निर्धार करण्यात आला. सभेनंतर महाजनादेश यात्रेचा भुसावळातच मुक्काम राहणार असून दुस-या दिवशी २४ रोजी सकाळी मुख्यमंत्री प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर खडका, किन्ही, बोदवडमार्गे मलकापूरकडे महाजनादेश यात्रा प्रयाण करणार %असल्याची माहिती भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शहर सजले – महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भुसावळात येत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी स्थानिक भाजपा पदाधिकारी रविवारी नियोजन बैठक घेतली. यावेळी शहरातील रस्त्यांची डागडूजी, स्वागताचे फलक व बॅनर्स लावून शहर भाजपामय करण्यात आले  आहे . त्यानुसार शहरातील मुख्य मार्गावर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठीचे फलक लावण्यात आले आहेत. तसेच जळगाव रोडवरील खड्डेही बुजविण्यात आले असून दुभाजकांमध्ये विविध शोभेची रोपे लावण्यात आली आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सभेसाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे.शहरात सभेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध फलकांनी शहर सजविण्यात आले आहेत. तसेच पोलीस प्रशासनानेही बंदोबस्ताची चोख तयारी केली आहे. सभा यशस्वी होण्यासाठी  आ.संजय सावकारे, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलजा पाटील, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, गटनेता मुन्ना तेली, युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे, परीक्षीत ब-हाटे, अनिकेत पाटील, रमेश मकासरे यांच्यासह सर्व नगरसेवक, पं.स.सदस्य, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.