जळगाव – 1501 गावांपैकी जवळपास 1000 गावांपेक्षा जास्त मधील जनता व जनावरांना टंचाईची झळा बसली आहे. पण्यासाठी रानोमाळ वणवण भटकंती करुनही हंडाभर पाण्यासाठी महिला रात्रीचा दिवस करीत आहे. अशी परिस्थिती असातांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्र्यांचे संकटमोचन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची जिल्ह्यावासियांकडे दुर्लक्ष करीत जनतेला वार्यावर सोडले आहे, असा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष राधेश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात एक तरी टंचाई निवारणार्थ आढावा बैठक घेतली का? त्यांच्या जामनेर तालुक्यात टंचाईची काय परिस्थिती आहे, हे तरी त्यांना ठाऊक आहे का? पण जळगावच्या जनतेला संकटात असतांना ते बघ्याची भूमिका कशी घेऊ शकतात? यंदाच्या भीषण दुष्काळात माणसांना पाणी नाही तर मुक्या जनावरांचे काय हाल असतील? पालकमंत्री चंद्रकांत पाटील टंचाईची स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्ह्यात महिनाभर फिरकलेल नाही.माध्यमही गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील दुष्काळ, पाणीटंचाईचे भीषण वास्तव मांडताहेत. काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र दुष्काळी समितीने बाळासाहेब थोरात, डॉ.सुधीर तांबे, ड.संदीप पाटील आदि नेत्यांच्या नेतृत्वात जिल्हाभर दौरे केलेत. त्यानंतर जग आल्यावर काल चंद्रकांत पाटलांनी तीन तालुक्यातील नऊ गावांना धावत्या भेटी देऊन सोपस्कार पार पडण्याचे काम केले. त्यातही त्यांनी दुष्काळाने होरपळलेल्या जनतेच्या दुखावर फुंकर मारण्या ऐवजी पीककर्ज घेऊन एफ डी करणार्या शेतकर्यांची संख्या किती ?असे असंवेदनशील विधान करून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असेही चौधरी यांनी सांगितले.