Wednesday, February 1, 2023

मुख्यमंत्री शिवसेनेचा, पण संजय राऊत भांडी घासतो पवारांची; निलेश राणेंचा घणाघात

- Advertisement -

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचे पुत्र पार्थ पवार आणि दोन बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा देत अपना टाइम आयेगा असे म्हटले आहे. त्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडले.

 

- Advertisement -

संज्या राऊत म्हणतो अपना टाईम आयेगा… मुख्यमंत्री शिवसेनेचा, भांडी घासतो पवारांची तरी याला वाटत नाही याचा टाईम आला आहे. संजय राऊत ने स्वतःची नाही तर उद्धव ठाकरे यांची लायकी दाखवली आहे. सत्तेत असून सुद्धा उद्धव ठाकरे मध्ये दम नाही याचा हा अर्थ होतो. अस ट्विट निलेश राणे यांनी केलं. एखाद्या कुटुंबावर राजकीय कुटुंबावर अशाप्रकारे दहशत निर्माण करणारी छापेमारी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांवर सुरू आहे. हेही दिवस निघून जातील, दिल्लीत आमचेही दिवस येतील, अपना टाईम भी आयेगा, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे