Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
राज ठाकरे यांची मनसेच्या पाडवा मेळाव्यात चौफेर टोलेबाजी ; मनसेचा पाडवा मेळावा उत्साहात
मुंबई ;-
मुख्यमंत्र्यांनी नदीवर तयार केलेल्या थीम सॉंगवर राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली आहे. यात दिसणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्गातील मॉनिटर आहेत. ते वर्गशिक्षकांचे आवडते असतील मात्र, विद्यार्थ्यांचे नावडते आहेत. सुधीर मुनगंटीवार हे शोलेतील सांबा आहेत, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. मनसे हा पक्ष संपला असं ज्यांना वाटतंय त्यांनी व्यासपीठावर या आणि हा जिवंत महाराष्ट्र पाहावा , दरवर्षी गुढीपाडव्याला मनसेची सभा येथे होणार असे ठाम मत राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील मनसेच्या ‘पाडवा मेळाव्या’त केले .
यावेळी मनसेच्या पाडवा मेळाव्याचे उद्घाटन माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले .
राज ठाकरे म्हणाले कि राज्याचा मुख्यमंत्री हा बसवलेला मुख्यमंत्री असून आलेला नाही अशी जहरी टीका देवेंद्र फडणवीसांवर केली . धर्मा पाटीलांची जमीन २०४ गुंठे आहे तिथे त्यांना ४ लाख मोबदला दिला गेला, आणि बाजूच्याच जमिनीला जी ७४ गुंठे आहे, तिला कोट्यवधी रुपये दिले गेले घणाघाती आरोप ठाकरे यांनी सरकारवर केला . सत्तेत येण्याआधी शेतकऱ्यांना दिलेले एकही आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. सत्तेत येण्याआधी भाजपने शेतकऱ्यांना दीडपट हमीभावाचं आश्वासन दिले ते सरकारने पूर्ण केले नाही . सगळेच प्रश्न संपल्यामुळे आमचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री गाणी गात आहेत. हे काम आहे का मुख्यमंत्र्यांचं, अर्थमंत्र्यांचे? हे जर इतर कोणी केलं असतं तर माध्यमांनी किती टीका केली असती? पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा हे अक्षय कुमारचे सिनेमे हे केंद्रशासित पुरस्कृत आहेत. अक्षय कुमार सध्या आधुनिक मनोज कुमारांच्या भूमिकेत आहेत. आणि आपल्याला देशभक्ती शिकवणारे अक्षय कुमार कॅनडाचे नागरिक आहेत, अशीही माहिती त्यांनी या वेळी दिली. नीरव मोदीचे प्रकरण विसरण्यासाठी श्रीदेवीच्या निधनाची बातमी सुरु केली, श्रीदेवीने कोणते राष्ट्रीय कार्य केले होते, की तिचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळले होते. शेवटी उघड काय झाले तर त्यांचा मृत्यू दारू पिऊन गेल्या झळकल्या . श्रीदेवींचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळण्याइतके त्यांचे कर्तृत्व काय ;असा सवाल राज यांनी उपस्थित करीत श्रीदेवीची बातमी मीडिया दाखवते परंतु, न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची बातमी का दाखवली नाही असे सांगत मीडियावर टीका केली . यावेळी नितीन गडकरी यांच्यावरही राज यांनी निशाणा साधला . भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरशाही पद्धतीचा वापर करतात. हिटलरशाहीच्या प्रचारावरची पुस्तकं नीट वाचलीत तर तुमच्या लक्षात येईल असे तेम्हणाले .