मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

0

पणजी :- मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या प्रमोद सावंत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यामुळे प्रमोद सांवत यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालं आहे. 15 विरुद्ध 21 मतांनी प्रमोद सावंत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. प्रमोद सावंत यांच्या बाजूने भाजपा (11), महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या (3), गोवा फॉरवर्ड (3) आणि अपक्ष (3) यांनी मतदान केले. तर काँग्रेस (14), एनसीपी (चर्चिल) 1 यांनी विरोधात मतदान केले.

मनोहर पर्रीकर यांच्या निधनाने गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांचा सोमवारी मध्यरात्री शपथविधी झाला. यानंतर भाजपला विधानसभेत शक्तिपरीक्षेला सामोरे जावे लागले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बहुमताचा दावा केल्यानंतर राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी बुधवारी विधानसभेचे विशेष सत्र बोलावले होते. गोव्यात भाजपाचे संख्याबळ १२ असून, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या प्रत्येकी तीन आमदारांबरोबरच तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपाने केला होता. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनं 20 आमदारांनी मतदान केल्यानं सावंत यांचं मुख्यमंत्रिपद कायम राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.