मुख्यमंत्री ग्रामसडकमधून जामनेर तालुक्यातील शेती व ग्रामीण रस्त्यांचा होणार कायापालट !

0

जामनेर तालुक्यातील ९ कोटींच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी

जामनेर  :- नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या रस्त्यांच्या समस्येला प्राधान्य देवुन जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन यांनी जामनेर तालुक्यातील रस्त्यांसाठी भरघोस निधीला मंजुरी मिळवली असुन शेती रस्त्यांसह इतर रस्त्यांमुळे ५ – ६ गावांच्या रस्ते मजबुती करनासाठी सुमारे ९  कोटी रूपयांचा निधी मंजुर केला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी ना. महाजन यांचे कामांचे कौतुक करीत असून समाधान व्यक्त करत आहेत.

जामनेर  तालुक्यात  ९ कोटींचा निधी
जामनेर मतदारसंघातील  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जामनेर तालुक्यातिल  प्र.जि।मा. 29 ते शेळगाव लांबी 3.81 किमि करिता 2कोटी 62 लाख रुपये. रा.मा46 भारुडखेडे ते कुंभारी रस्त्याच्यासाठी 3.22 K.M 2कोटी46 लाख.प्र.जि.मा 5 ते भागदारा रस्त्याकरिता 3कोटी 60 लाख. आशा तिन रस्त्या करिता 11.50  K.M  रस्त्याच्या  मजबुतीकरण  डांबरीकरण साठी (पुल/मोऱ्यांच्या कामासह )  तसेच देखभाल दुरुस्तीसाठी  42 लक्ष  असे एकूण सुमारे 9 कोटी 42लाखाचा  निधींच्या  कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.    मंजुर शेतकऱ्यांचे कैवारी जलसंपदा मंत्री  ना.गिरीषभाऊ महाजन यांनी सतत पाठपुरावा केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.