मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १२ रोजी जळगाव जिल्ह्यात

0

जळगाव :-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार दि. 12 सप्टेंबर, 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता शासकिय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळ येथे आगमन व हॅलिकॉप्टरने मौजे हडसन शिवार हेलीपॅड, ता. पाचोरा, जि.जळगावकडे प्रयाण. दुपारी 12.15 वा. मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व मोटारीने एम.एम.कॉलेज मैदान पाचोराकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ – एम.एम.कॉलेज मैदान पाचोरा) दुपारी 2.30 वा. मोटारीने मौजे नांद्रा ता. पाचोराकडे प्रयाण. दुपारी 2.50 वा. नर्मदा ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट या कंपनीचे उद्घाटन व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मौजे निंभोरा (नगरदेवळा रेल्वेस्टेशन जवळ), ता. भडगाव, जि.जळगाव व पाचोरा येथे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नविन मुख्य इमारत बांधकामाचे ई-भुमीपुजन (स्थळ- नांद्रा ता. पाचोरा, जि.जळगाव), दुपारी 3.30 वा. मोटारीने मौजे हडसन शिवार हेलीपॅडकडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व हेलीकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 4.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Leave A Reply

Your email address will not be published.