Sunday, January 29, 2023

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर होणार शस्त्रक्रिया

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मान आणि पाठदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. सध्या उध्दव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसांपासून गाठीभेटी कमी केल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांचा मान आणि पाठीचा विकार मागील काही दिवसांपासून बळावला आहे. हा त्रास अधिक वाढू नये यासाठी एचएन रिलायन्स रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांना लहान शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवला आहे. मात्र, शस्त्रक्रिया करायची की नाही, याचा निर्णय स्वत: ठाकरे घेणार आहेत. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा देखील आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांना हा त्रास जाणवत असून, त्यांनी भेटीगाठीही टाळल्या आहेत. सोमवारी पंढरपूरमधील पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी आभासी स्वरूपात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा लावलेला होता.

त्यामुळे अनेकांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पाठदुखी आणि मानेच्या स्नायूंच्या दुखापतीचा त्रास होत असल्यामुळे काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठदुखी आणि मानेचा स्नायूच्या दुखापतीमुळे पट्टा लावण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे