मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शासकीय निवासात कोरोनाचा शिरकाव; पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

0

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर तैनात असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि महिला कॉन्स्टेबल कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर तिकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या या दोन्ही शासकीय निवास्थानावरील तैनात असलेल्या सर्व पोलिसांना क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगितलं आहे, अशी माहिती मुंबई महापालिका अधिकाऱ्याने दिली. दरम्यान,या संपूर्ण प्रकरणाचे वृत्त वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावरील सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा Covid-19 चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या संपर्कात असलेल्या निकटच्या ६ जणांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, वर्षा बंगल्यावरच तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलचाही करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. न्यूज १८ ने हे वृत्त दिले आहे. दरम्यान सध्या वर्षा बंगल्यावर कोणी राहत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुटुंबासह वांद्र्यात मातोश्री येथे राहतात. वर्षा बंगल्यावरील करोनाची लागण झालेल्या महिला कॉन्स्टेबलला आम्ही रुग्णालयात दाखल केले असून तिच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु आहेअसे वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.