Saturday, January 28, 2023

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण

- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कानळदा ता. जि. जळगांव येथील जि. प. मुलींची शाळा येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त `प्रेरणा पंधरवडा’ अंतर्गत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी – पुरवठा व स्वच्छतामंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शिक्षक सेनेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन कानळदा येथे करण्यात आले.

याप्रसंगी जळगाव शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, जळगाव शिवसेनेचे पदाधिकारी जनार्दन पाटील, फुपणी गावाचे सरपंच डॉ. कमलाकर पाटील, शिक्षकसेना उर्दू विभाग प्रमुख इलियास शेख, कानळदा गावाचे सरपंच पुंडलिक सपकाळे, जळगांव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, जिल्हा सरचिटणीस नाना पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संदिप पवार, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल चौधरी, जळगाव तालुका शिक्षक सेना अध्यक्ष राजू पाटील उमाळेकर, जळगाव तालुका शिक्षक सेना सरचिटणीस निळकंठ चौधरी, धरणगाव शिक्षकसेना तालुकाध्यक्ष रमेश बोरसे, एरंडोल शिक्षक सेना तालुकाध्यक्ष सचिन सरकटे, धरणगाव शिक्षकसेना  पदाधिकारी विनोद पाटील, यशवंत शिरोळे, जळगाव तालुका शिक्षक सेना पदाधिकारी नितेश कोळी, मिलिंद कोल्हे, मुकेश पाटील, किशोर पाटील, संजय पाटील, विलास चौधरी, नाना ठेलारी, विश्वास ठाकूर, लोटन पवार, संतोष वानखेडे, कैलास परदेशी, अरुण सोनवणे, ललिता पाटील, माधवी चव्हाण तसेच  ग्रामपंचायत सदस्य, गावातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप पवार तर आभार प्रदर्शन माधवी चव्हाण यांनी केले.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे