मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार आहेत. आज रात्री आठ वाजता ते जनतेशी संवाद साधतील. यावेळी नेमके ते कोणत्या विषयावर बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यातील २५ जिल्यात कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र हॉटेल मालक व व्यापारी अद्याप या निर्णयावर समाधानी नाही आहेत. त्यामुळे पुणे अथवा इतर जिल्ह्यात नियम मोडून दुकाने हॉटेल उघडी ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे या विषयावर मुख्यमंत्री भाष्य करताना दिसणार आहेत.
तसेच मुंबईकरांसाठी महत्वाचा विषय असलेल्या लोकल संदर्भात अदयाप काहीही निर्णय झालेला नाही आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून दोन डोस घेतलेल्या रेल्वे प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी विरोधक करत आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी लोकल सुरु करण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लोकल संदर्भात काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.