मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी राज्यात महाआघाडी तयार – नारायण राणे

0

नागरपूर : मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी राज्यात महाआघाडी तयार झाली, बाळासाहेब ठाकरे असते तर महाआघाडी तयार झालीच नसती. उद्धव ठाकरे देखील मुख्यमंत्री झाले नसते, असं वक्तव्य भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी आज नागपुरात केलं.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरच्या दौऱ्यावर आलेल्या नारायण राणे यांनी विधिमंडळाचे कामकाज आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारवर चौफेर टीका केली आहे. मुख्यमंत्री जुना की नवा यात जाणार नाही पण मुख्यमंत्री कर्तबगार पाहिजे. राज्यासमोर असलेल्या प्रश्नांची माहिती आणि ते सोडवण्याची धमक असणारा मुख्यमंत्री राज्याला हवा. सध्याच्या परिस्थितीत मला राज्याची चिंता वाटते. राज्याचे उत्पन्न वाढले पाहिजे, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. माात्र सध्याचे मुख्यमंत्री तसे प्रयत्न करतील याबाबत मला शंका वाटते, असे नारायण राणे म्हणाले.

या सरकारने शेतकरी, बेरोजगार विद्यार्थी, यांच्यासाठी कोणताही विचार केलेला नाही असे राणे म्हणाले. हे हिवाळी अधिवेशननसून एखादा घरगुती कार्यक्रम आहे अशीही टीका नारायण राणे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.