मुक्ताईनगर व रावेर यावल मध्ये रंगणार चुरशीच्या लढती

0

सावदा (रोशन वाघुळदे) – संपूर्ण जिल्हाभरात विधानसभा निवडणुकी चे अंतिम चरण सुरू आहे. प्रचाराचे तापलेले वातावरण ही आज थंड होणार आहे. मात्र, यंदा च्या निवडणुकीत जिल्ह्यात खरी रंगत मुक्ताईनगर व रावेर मतदारसंघात होणार असल्याने या मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मक्ताईनगर हा मतदारसंघ गेल्या तीस वर्षापासून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या तीस वर्षात एकनाथराव खडसे यांनी विकासकामांचा येथे उभा केला आहे. तरीही गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनेने या मतदारसंघात आपले पकड चांगले निर्माण केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीवेळी भाजपा-शिवसेना युती नसल्याने शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील व भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांच्यात चांगलीच लढत रंगली होती. यावेळी पक्षाने एकनाथराव खडसे यांचे तिकीट कापले यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा रोष व्यक्त करून पक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र, ऐनवेळी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देऊन तसेच एकनाथराव खडसे यांनी पक्षाविरोधात कॉन्टॅक काम न करताना आपल्या पक्षाचा उमेदवार सोबत आपण राहू पक्षाने आपल्याला बरेच काही दिले आहे. त्यामुळे पक्षाचे साथ कधी सोडणार नाही असे जाहीर करून पुन्हा एकदा चांगले वातावरण निर्मिती केली. त्यातच शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेकडून तिकीट मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, युती धर्मानुसार जागा भाजपला असल्याने चंद्रकांत पाटील यांचा हिरमोड झाला पर्यायाने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली ऐनवेळी राष्ट्रवादीच्या रवींद्र भैय्या पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेत अपेक्षा चंद्रकांत पाटील यांना पक्षासह पाठिंबा दर्शवला यामुळे अन्य उमेदवार असले तरी खरी लढत अपक्ष व राष्ट्रवादी पुरस्कृत चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाच्या रोहिणी ताई खडसे यांच्या तर होणार आहे. निवडणुकीतला अवघे काही तास शिल्लक असताना मतदारसंघात प्रत्येकाचे कार्यकर्ते आपलाच उमेदवार विजयी होईल याचे दावे-प्रतिदावे करीत आहेत लढत चुरशीची होणार यात शंका नाही मात्र गेल्या तीस वर्षापासून भाजपचा बालेकिल्ला राहिलेला मुक्ताईनगर विधानसभा संघ यंदा कायम राहतो की चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने नव्यांना संधी देतो हे येणारा काळच ठरवणार आहे.

तर दुसरीकडे रावेर यावल विधानसभा मतदार संघात आठ उमेदवार असले तरी खरी लढत भाजपाचे हरिभाऊ लावण्या राष्ट्रीय काँग्रेस आईचे श्री दादा चौधरी व अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्यातच राहणार आहे. गेल्या निवडणुकीत गेल्या विधानसभा निवडणुकीत जी भूमिका गफ्फार मलिक यांनी निभावली होती. भूमिका यांना च्या निवडणुकीत अनिल मी भावतील असे मतदारांचे चर्चा आहे. तर हरिभाऊ जावळे व शिरीष दादा चौधरी यांच्यातच यांच्यातच खरी अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षात हरिभाऊंनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ते मते मागत आहेत तर श्री दादा चौधरी आपला पारंपरिक वारसा ने आधी केलेल्या कार्याची आठवण येत मतदारांना सामोरे जात आहे. निवडणूक व निवडणुकीचा निकाल लवकर समोर येणार आहे दोन्ही मतदारसंघात चुरशीच्या लढती अपेक्षित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.