मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : वाढदिवस म्हटला म्हणजे केक ,पुष्पगुच्छ व इतर संकल्पना उत्साहात साजरा करून आनंद व्यक्त करणे असाच समज सगळीकडे आहे. मात्र मुक्ताईनगर येथे दैनिक लोकमतचे वार्ताहर मतीन शेख यांनी मात्र आपल्या वाढदिवसाला इतर पत्रकारांच्या कोरोना चाचणी करून एक आगळा वेगळा स्तुत्य उपक्रम आखत समाजात आदर्श निर्माण केला आहे.
मुक्ताईनगर चे दैनिक लोकमतचे वार्ताहार मतीन शेख यांचा सोमवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त मतीन शेख यांनी सर्वच शहरातील व तालुक्यातील पत्रकारांना आपल्या युनिक पॅथॉलॉजी लॅब मध्ये बोलावून स्वतः कोरोना चाचणीचे किट मागवत सर्व पत्रकारांच्या चाचण्या केल्या. विशेष म्हणजे एकही पत्रकार याप्रसंगी पॉझिटिव्ह आला नाही. पत्रकारांनी पुष्पगुच्छ केक आणू नये असा आग्रह त्यांनी आधीच धरलेला होता. या सर्व गोष्टींना फाटा देत सर्वांनी कोरोना चाचण्या करणे आवश्यक आहे व समाजातील प्रत्येक व्यक्तीने कोरोणा चाचणी करून आपण सुपर स्प्रेडर बनणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन नाही मतीन शेख करायला विसरले नाही.