मुक्ताईनगर ;- येथील उत्तमचंद रेदासणी फाउंडेशन तर्फे दिवाळीच्या पावन पर्वावर सर्वसामान्यांच्या जीवनातील दिवाली सुद्धा आनंदात जावी व दिवाळीचा दिवस गोड व्हावा या उद्देशाने प्रेरित होत शहरातील भिलवाडा परिसरात दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला.
कोणत्याही प्रकारचा बडेजावपणा न करता अतिशय सर्वसाधारण रित्या सर्वसामान्यांच्या घरातील दिवाळी गोड व्हावी व दिवाळीचा सण आनंदात जावा म्हणून संघटनेतर्फे दरवर्षी फराळ वाटप केला जातो याहीवर्षी संयम मेडिकलचे संचालक सचिन जैन( रेदासाणी) यांच्या अध्यक्षतेखाली दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला.
याप्रसंगी सचिन जैन (रेदासानी),नगरसेवक डॉक्टर प्रदीप पाटील,संयम जैन(रेदासनि), संजयभाऊ काळे,लक्ष्मणभाऊ भलभले, वंदे मातरम ग्रुप चे अध्यक्ष धनंजयभाऊ सापधरे, मुस्लिम मणियार बिरादरीचे जिल्हा सचिव हकीमभाई चौधरी, पंकजभाऊ पाटील, राहुलभाऊ शुरपाटने , प्रशांतभाऊ श्रीरामें, किरणमहाजन,विनायक वाडेकर हे प्रमुख उपस्थित होते.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.