मुक्ताईनगर :- मुक्ताईनगर व बोदवड तालुक्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या सारोळा -माळेगाव शिवारातील प्रस्तावित औद्योगिक वसाहत MIDC व्हावी या आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आग्रही मागणी प्रस्तावास मंजुरी मिळणेकामी शासन स्तरावर एक्स्प्रेस च्या गतीने कामकाज सुरू आहे. सहा महिन्यात महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन MIDC म्हणजेच औद्योगिक वसाहत मंडळ चे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे भेटी व जागेची पाहणी करण्यात आलेली आहे.
दरम्यान आज बुधवार रोजी दि.२४ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन MIDC म्हणजेच औद्योगिक वसाहत मंडळ चे वरिष्ठ भूमापक अधिकारी पुन्हा जागेची
निश्चिती व हद्द ठरविण्या बाबत, सिमांकन करण्यासाठी आले होते. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत हद्द ठरविण्याबाबत महत्वपूर्ण सखोल चर्चा केली. त्यामुळे आता मुक्ताईनगर मतदार संघाचे MIDC चे स्वप्न पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे.
प्रसंगी प्रमुख भूमापक सुधीर उगले ,भूमापक श्री.ठाकरे, श्री. चौरे निमखेडी खु व सारोळा तलाठी यांच्यासह राजेंद्र कांडेलकर, स्वीय सहायक प्रवीण चौधरी तसेच औद्योगिक वसाहत मंडळाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .