मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई महाविद्यालयाला मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांनी दिली भेट

0

विद्यार्थिनींच्या संख्येबद्दल प्राचार्य व संचालक मंडळाच केले कौतुक

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : येथील विकास आघाडीच्या भव्य शेतकरी मेळाव्यासाठी संत मुक्ताबाई कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणातील हेलिपॅडवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी कृषिमंत्री शरद पवार उतरल्यानंतर दोघांनी संत मुक्ताबाई कला व वाणिज्य या महाविद्यालयाला भेट दिली. सभेच्या सुरुवातीला शरद पवार यांनी मुक्ताबाई कला वाणिज्य महाविद्यालय भेट दिली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभा संपल्यानंतर भेट दिली.

याप्रसंगी माजी राष्ट्रपती महामहीम प्रतिभाताई पाटील यांचे चिरंजीव व संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार रावसाहेब शेखावत महाविद्यालयाचे व प्राचार्य डॉक्टर आय डी पाटील यांच्याशी संवाद साधून महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा जाणून घेतल्या. महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर हेलिपॅड उभारण्यात आले होते.दुसऱ्या आवारात असलेल्या महाविद्यालयाच्या भव्य वास्तूत  प्रवेश करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक सोयीसुविधा ,सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान इत्यादींचे भरभरून कौतुक केले. महाविद्यालयातील मुलींची प्रवेश संख्या ऐकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संस्थेचे व प्राचार्यांचे कौतुक केले. संत मुक्ताबाई महाविद्यालय हे संपूर्ण देशभरातून नेक ग्रेडेशन करण्याचे काम करत असल्याने आणि सांस्कृतिक खेळ तसेच इतर सहशालेय उपक्रम राबविण्यात अग्रेसर असल्याची माहिती याप्रसंगी महाविद्यालयातर्फे देण्यात आली. मेळाव्याचे आयोजक आमदार चंद्रकांत पाटील हेच या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याची माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्री व शरद पवार यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचे देखील कौतुक केले.याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील ,नामदार दिलीप वळसे पाटील, कृषिमंत्री दादासाहेब भुसे ,एडवोकेट रवींद्र पाटील, विनोद तराळ ,सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे ,डॉक्टर संजय शेखावत ,शशिकांत कुलकर्णी उपप्राचार्य एल बी गायकवाड प्राध्यापक वृंद तसेच प्राध्यापक इतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.