मुक्ताईनगर तालुक्यात रिगाव वनविभागाच्या हद्दीत आढळले अजगर

0
कु-हाकाकोडा,, वार्ताहर,,मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा  वनक्षेत्रात असलेल्या रिगाव परिसरात पाच ते सात फुटाचे दोन अजगर आढळल्याने त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . वनविभागाने सर्पमित्राला बोलवून या दोन्ही अजगराला वनविभागात सोडले आहे.
या  आधीच वनविभागात बिबट्याची दहशत असल्यामुळे  शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण असताना अशी अजगर सारखे हिस्त्र प्राण्यांचा वावर या परिसरात वाढला असल्यामुळे  आणखी भीतीचे वातावरण शेतकऱ्यांत निर्माण झाला आहे
विभागातील वनक्षेत्रपाल चव्हाण साहेबयांचं नेहमी वन विभागाकडे दुर्लक्ष करीतअसल्याचे नागरिकात बोलले जात आहे. त्यांचा कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय वचक राहिलेला नाही
त्यांच्यावर कर्मचाऱ्यांचा वचक असल्याचे दिसून येत आहे ऑफिस कामाचा सुद्धा त्यांना अभ्यास नाही हे दिसून येत आहे तर वन विभागाचा प्रश्न गंभीर आहे त्यांना प्रशासनातला अनुभवून नसल्याचा ते नेहमीते बोलत असतात त्यांच्यासाठी त्यांनी रिटायरमेंट झालेले काही कर्मचाऱ्यांचा सल्ल्याने कामकाज पाहत असतात यावरून त्यांची बुद्धिमत्ता किती आहे हे कळते
वडोदा वनक्षेत्र मध्ये फिरताना कधी नागरिकांना दिसत नाही कर्मचारी वैयक्तिक कामासाठी बाहेरगावी नातेवाईकांकडे नेहमी जात असतात जंगलाकडे पाठ फिरवत असतात यांना माहिती असून सुद्धा हे त्या कर्मचाऱ्यांना कधी काहीच बोलत नाही यामुळं वडोदा वनक्षेत्र वाळवंट होण्याच्या मार्गावर आहेयाला सर्वस्वी जबाबदार वडोदा वनक्षेत्रपाल चव्हाण जबाबदार आहे असं नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे

Leave A Reply

Your email address will not be published.