Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»मुक्ताईनगर कोविड सेंटर येथे व्हेंटिलेटर उपलब्ध ; खा रक्षाताई खडसेंच्या प्रयत्नांना यश
    जळगाव

    मुक्ताईनगर कोविड सेंटर येथे व्हेंटिलेटर उपलब्ध ; खा रक्षाताई खडसेंच्या प्रयत्नांना यश

    By September 3, 2020No Comments74 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर (प्रतिनीधी) : कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी खासदार रक्षाताई खडसे यांनी जळगाव जिल्ह्यात केंद्रीय समितीचे पथक पाठवण्याची मागणी आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे केली होती. त्या मागणीनुसार केंद्रीय आरोग्य समितीचे सदस्यांनी जळगाव जिल्ह्यात दौरा करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला होता व गंभीर रुग्णांना आवश्यक व्हेंटिलेटरची संख्या कमी असल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त आहे असे निरीक्षण नोंदवले होते.

    कोरोनाच्या गंभीर रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. कारण गंभीर रुग्ण अधिक आणि व्हेंटिलेटर अगदी कमी, अशी अवस्था निर्माण होत आहे. यासाठीच खासदार रक्षाताई खडसे यांनी रावेर लोकसभा क्षेत्रातील कोरोनाच्या गंभीर रुग्णासाठी तातडीने व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला यश मिळून पंतप्रधान सहायता निधीमधून मुक्ताईनगर येथे व्हेंटिलेटर मिळाले असल्याने आरोग्य यंत्रणेला बळकटी मिळाली आहे.

    रुग्णांमध्ये कोरोनासोबतच इतरही गंभीर स्वरूपाच्या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांची प्रकृती गंभीर असते. परिणामी, त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. त्यानुसार डॉक्टरही रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याचा सल्ला देतात; परंतु सद्य:स्थितीत गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपलब्ध व्हेंटिलेटर अपुरे पडत आहेत. ऐनवेळी आवश्यक सुविधा न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. या व्हेंटिलेटरमुळे कोरोनाच्या गंभीर रूग्णांना दिलासा मिळून त्यांचा जीव वाचवता येईल अशी आशा खासदार रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केली आहे.

    मुक्ताईनगर येथील कोविड सेंटर येथे व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णांवर उपचारासाठी अडचणी येत होत्या. तसेच अनेक गंभीर रुग्ण व्हेंटिलेटर नसल्यामुळे जळगाव येथे पाठवावे लागत होते. मुक्ताईनगर पासून जळगाव 60 किलोमीटर वर आहे, त्यामुळे गंभीर रुग्णांना हलवणे सुद्धा जिकिरीचे होते. मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय येथे व्हेंटिलेटरचे लोकार्पण खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.

    याप्रसंगी जिप सभापती जयपाल बोदडे, नगराध्यक्ष नजमाताई तडवी, भाजप तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, प्रभारी पंस सभापती विद्याताई पाटील, सरचिटणीस सुनील काटे, तालुका उपाध्यक्ष निलेश मालवेकर, उपनगराध्यक्ष मनीषाताई पाटील, जिप सदस्य वैशाली ताई तायडे, जिप सदस्य निलेश पाटील, तालुका उपाध्यक्ष मोहन महाजन, भाजयुमो विधानसभा क्षेत्रप्रमुख दत्ताभाऊ पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी,भाजयुमो सरचिटणीस मुन्ना बोंडे, भैय्या पाटील, उपाध्यक्ष जयेश कारले, शुभम काळे, बापू ससाणे, प्रदीप साळुंखे, प्रवीण पाटील, प्रसिद्धीप्रमुख शिवराज पाटील व मान्यवर उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्षपदी संध्या कांकरिया

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif