मुक्ताईनगर | प्रतिनिधी
अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र आणि शिवचरण उज्जैन कर फाऊंडेशन, मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ व ७ जुन गुरूवार आणि शुक्रवारी गोदावरी मंगल कार्यालयात मोठे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवस चालणाऱ्या संमेलनात विविध प्रकारच्या कार्यक्रम आयोजित केले आहेत.अध्यक्ष म्हणून जेस्ट साहित्यिक मा .प्राचार्य डॉ. किसनराव पाटील ,उद्घाटक मा.एकनाथराव खडसे ,स्वागत अध्यक्ष मा.रक्षाताई खडसे खासदार हे असतील .ग्रंथ दिंडी दि ६ जुन सकाळी ७ .३० ते १० व १०ते १ उद्घाटन सोहळा सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित अतीथी म्हणून विविध पक्षाचे नेते आणि पदधीकारी ,जेस्ट कवी साहित्यिक ,गायक ,नाटकार गझलकार ,हौशी कलावंत उपस्थित राहणार आहे .तसेच अंकुर वाडःमय पुरस्कार २०१७ चे मान्यवर पुरस्काराथी मा .तुळशीराम बोबडे केंद्रीय कार्याअध्यक्ष ,व मा .वाकुडकर ( नागपूर ) सखे साजनी काव्य गितांच्या कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि दगडालाही फुटेल हसू व्यंगचित्र प्रदर्शनी मा. दगडु वाहुर वाघ याचा कार्यक्रम सादर केले जाईल असे अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहेत .मुक्ताईनगर ला पहिल्यादाच असा भव्यदिव्य राज्य स्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे याचे मुख्य आयोजक मा .शिवचरण उज्जैन कर (शिवा सर )केंद्रीय संघटक साहित्य संघ महाराष्ट्र तथा संस्थापक अध्यक्ष हे असुन निमंत्रक :-मा .निबाजी हिवरकर ,प्रमोद पिवटे ,अ .फ.भालेराव ,जयवंत बोदडे ,शामकांत रूले ,सुरेश बोरसे ,हकीम चौधरी ,शरद बोदडे ,चंद्रमणी ईगळे, प्रशांतराज तायडे ,ईतबार तडवी ,गोपाळ कासार ,प्रदिप कोसोदे ,अरूण जोगी ,विनायक वाडेकर ,राहुल तायडे ,आदी हजर राहाण्याचे आवाहन केले आहे.