मुक्ताईनगरात लवकरच अत्याधुनिक कक्ष उभारण्यात येणार -आ. चंद्रकांत पाटील

0
मुक्ताईनगर दि.29 (वार्ताहर) — कोरोना या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करण्यासाठी मुक्ताईनगर येथे पन्नास लाख रुपये खर्च करून आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने मुक्ताईनगरात लवकरच अत्याधुनिक कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती आ. चंद्रकांत पाटील यांनी दिली. सदर निधीची तरतूद आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य नियोजन विभागातर्फे करण्यात येणार आहे.
राज्यभरासह संपूर्ण देशभरात सध्या कोरोना या साथ रोगाशी लढण्यासाठी राज्य व केंद्र सरकार तर्फे तातडीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना या संसर्गजन्य आजारा संदर्भात प्रबोधन व उपाययोजना करण्यासाठी मुक्ताईनगर  शहरात  राज्यामध्ये सर्वप्रथम पहिल्यांदा  सभेचे  अर्जंट करण्यात आले होते . सध्या कोरोना चा एक रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे त्यामुळे मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील , उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. योगेश राणे तसेच डॉ. राहुल ठाकोर यांच्या उपस्थितीत कोरोना संदर्भात 50 लाख खर्च करून त्यात व्हेंटिलेटर , मल्टी प्यारा मॉनिटर , बाय प्याब मशीन , आय. सी. यु. ऑटोमॅटिक बेड,  डिजिटल एक्स-रे मशीन, ई.सी.जी ., डी फॅब्रीलेटर मशीन , इन्फ्रारेड थर्मा मिटर, एन -नाईंटी फाईव्ह मास्क,  ग्लोज तसेच पी .पी. ई. किट , हायपोक्लॉराइड सोल्युशन त्यासोबतच सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने कोव्हीड- नाईंटीन या विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना करिता प्रमाणित केलेली इतर तत्सम वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कक्ष उभारावयाचे आहे. यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी नगर येथील आरोग्य विभागाशी चर्चा केली. आणि अडचणी  समजून घेतल्या तसेच आरोग्य विभागाला सूचना केल्या आणि कोरोना विषाणू प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन दिले. या अत्याधुनिक कक्षाचा फायदा जवळच असलेल्या रावेर बोदवड तालुक्याला सुद्धा होणार असल्याने सदर अत्याधुनिक कक्षाची सुविधा मुक्ताईनगर या मध्यवर्ती ठिकाणी करण्यात येत असल्याची माहितीही आ. पाटील यांनी दिली.
Leave A Reply

Your email address will not be published.