मुक्ताईनगर (वार्ताहर) :-राज्यासह मुक्ताईनगर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याच्या पर्श्वभूमीवर शिक्षकांची आयक्यू सेंटरवरनेमणूक करण्यात आली आहे परंतु त्या ठिकाणी कोणत्या सुविधा देण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे कोरूनच्या कर्तव्यावरील शिक्षक कर्मचाऱ्यांना संरक्षण तसेच सुविधा देण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन एका दैनिक ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर यासंदर्भात शिक्षक लोकशाही आघाडीतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन शिक्षक लोकशाही आघाडीचे तालुकाध्यक्ष शिवचरण मधुकर उज्जैनकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार श्याम वाडकर यांना देण्यात आले.याप्रसंगी नायब तहसीलदार प्रदीप झांबरे तसेच उपशिक्षक शरद बोदडे, चंद्रमणी इंगळे विनायक वाडेकर , एस. आर .मोरस्कर , महेंद्र तायडे, के.आर. कवळे आदींची उपस्थिती होती. सदर निवेदनात म्हटले आहे की , तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या ठिकाणीसदर शिक्षक कर्मचारी हे कोरोना बाधितांच्या संपर्कात येतात त्यामुळे शिक्षकही कोरना बाधित होण्याची शक्यता आहे .त्यांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य विभागातर्फे कोणत्या प्रकारचे सेनीटायझर , मास्क , अथवा इतर संरक्षणात्मक किट उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. या संदर्भात एका दैनिकात 13 जुलै 2020 रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार आय. क्यू. सेंटरमध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांना ड्युटी लावण्यात आले परंतु त्यांना मोठ्या असुविधांचा सामोरे जावे लागत आहे याकडे आरोग्य विभाग तसेच महसूल विभागाचे सुद्धा लक्षण असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत आज शिक्षक संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या ड्यूट्या रात्री आठ ते सकाळी आठ किंवा सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत अशी 12 – 12 घंटे देण्यात आलेली आहे. शिक्षक कर्तव्य बजावण्यास तयार आहेत.परंतु त्याठिकाणी साध्या खुर्च्यां व टेबल यांची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नव्हती. कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्यास त्याला जबाबदार कोण तसेच त्याच्या संरक्षणाची हमी कुणाची अशा स्वरूपाचे निवेदन शिक्षक लोकशाही आघाडीतर्फे देण्यात आले आहे.
कर्तव्या वरील कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणार – तहसीलदार
दरम्यान, शिक्षक संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनावर प्रतिक्रिया देताना तहसीलदार श्याम वाडकर यांनी कर्तव्यावर असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन याप्रसंगी दिले.

