मुक्ताईनगरहुन परप्रांतियांचा पायदळ प्रवास सुरूच ; उपाशीपोटी शेकडो किलोमीटर प्रवास

0

मुक्ताईनगर (मोहन मेढे) :- कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी देशभर लागू असलेल्या ताळेबंदीत लॉक डाउन केले असून संचारबंदी आहे तसेच जिल्हा सीमाही बंद केले असून कोरोना संकटाचे काळात समाज माध्यमावर फारच विपरीत परिणाम होत असून रेल्वे, एसटी बसेस, खासगी वाहने बंद असल्याने प्रवास करता येत नाही. त्यामुळे मुंबई ,पुणे, सुरत, आमदाबाद अशा मोठ्या शहरात कंपन्यांमध्ये कामाला युपी-बिहार ,नेपाळ,मध्यप्रदेश आदी भागातून परप्रांतीय युवक आपल्या कुटुंबासहित महाराष्ट्रात आले होते .त्यात लॉकडाऊन मुळे ते कामाचे ठिकाणी अडकून पडलेले असल्याने काही ठिकाणी कंपनीचे मालकांनी त्यांचे राहण्याची व खाण्या-पिण्याची व्यवस्था केली असून हाताला कोणतेही काम नसून कंपन्या बंद पडल्या अशा परिस्थितीत त्यांना घरची ओढ लागली असून परप्रांतीयांनी आपला सामान गुंडाळून ग्रुपने जथेच्या जथे पायीच प्रवासाला निघाले आहेत हे सारे मजुरी करणारे मजूर आहेत.

पायी प्रवासादरम्यान हे मजूर रात्रंदिवस नॅशनल हायवे क्रमांक 6 वरून आपले कुटुंबासहित सोबत लहान बालके सुद्धा काही जवळ असून डोक्यावर ओझे घेऊन उपाशीतापाशी शेकडो किलोमीटर अंतर पार करीत आहे. त्यांच्याजवळ पैसेही प्रवासादरम्यान संपले असून कसलीच तमा न बाळगता घराकडे आपल्या गावी जाण्याचे एकच लक्ष त्यांचे आहे .शेत शिवारातील विहिरीवर भर उन्हाळ्यात पाण्याची तहान भागवून कुठे खाण्यासाठी मिळाले तर टरबूज ,काकडी ,कच्चे केळी, पपई खाऊन आपल्या पोटाची भूक भागवत आहे. काही ठिकाणी तालुक्याच्या गावी महाराष्ट्र शासनाने अशा परप्रांतीय मजुरांसाठी निवारा केंद्र उघडले असून त्या ठिकाणी पोलीस बांधव त्यांना ताब्यात घेऊन मेडिकल करून कोरोना ची लागण तर नाही ना अशी आरोग्याचे चाचणी करुन खात्री करत असून निवारा केंद्रात रहिवासासाठी ठेवत आहे परंतु हे मजूर काही दिवस तेथे राहून तेथून सुद्धा रात्री आपले गावाकडे पायी प्रवास करून निघून जात आहेत तर काही वयोवृद्ध मजूर हे निवारा केंद्रातच थांबून आहे.

मुक्ताईनगरात सामाजिक संस्थाही करताहेत अन्नदान
या दरम्यान मुक्ताईनगर येथील वंदे मातरम ग्रुप,रामरोटी आश्रम व सामाजिक संस्था हे देखील सुरुवातीपासून अडकलेल्या मजुर, भिकारी , गरजू गोरगरीब लोकांना सकाळ-संध्याकाळ अन्नदान स्वतःहून वाटप करीत आहेत तर सरकारी दवाखाना खाजगी दवाखाने मधील असलेले पेशंट यांनादेखील अन्नदान करीत आहे .हायवे रोडवर देखील माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी रक्षा खडसे पेट्रोल पंपावर अन्नछत्र योजना चालू केली आहे. तसेच विद्यमान आमदार मा.चंद्रकांत भाऊ पाटील यांनी तर सर्वप्रथम शासनाकडून मुक्ताईनगर येथे शिवथाळी भोजन योजना सुरु केली आहे तेथे रोज अनेक गरजू गरीब लोक भोजनाचा लाभ घेत असून आपली भूक भागवीत आहे व कोरोनाचे लॉकडाऊन दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील मतदारसंघात दक्ष असून वेळोवेळी सर्व खातेनिहाय अधिकारी यांच्या बैठका घेऊन सतर्क राहून योग्य त्या सूचना करीत आहेत आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी आपली ड्युटी चौख पणे बजावून नागरिकांची काळजी घेत आहे. नगरपंचायत मार्फत प्रत्येक प्रभागात फवारणी करून कचरा गाडी रोज फिरुन सफाई कामगार मार्फत गटारी वगैरे साफ करीत असून स्वच्छता बाळगत आहे नागरिकांना तोंडाला मास्क लावून त्यांचा उपयोग करा अशा वेळोवेळी सूचना देत असून साबणाने हात धुवा व सोशल डिस्टन्स पाडा असे आवाहन करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.