मुक्ताईनगर:-(प्रतिनिधी) कोरोना लॉकडाऊनच्या काळात महावितरण कंपनीकडून आकारण्यात आलेल्या वाढीव वीज बिले तात्काळ सरसकट माफ करणे साठी भारतीय जनता पार्टी कडून मुख्यमंत्री यांना तहसीलदार तर्फे निवेदन सादर करण्यात आले.
लॉक डाऊन च्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीज बिले आली लॉक डाऊन मुळे आर्थिक तणावाखाली असलेल्या जनतेला सरकारने मोठ्या वीज बिलाचा शॉक दीला. याबाबत जन आक्रोश निर्माण झाल्यावर सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या उर्जामंत्र्यांनी विजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावीच लागतील असे स्वतः स्पष्ट सांगितले आहे दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे महा विकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करून जनतेला सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरणार आहे अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारने भरमसाठ वीजबिला बाबत महाराष्ट्रातील जनतेला रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भाजपा मुक्ताईनगर तर्फे माननीय खासदार रक्षाताई खडसे, बेटी बचाव बेटी पढाव चे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके व माजी जि. प. अध्यक्ष श्री अशोक कांडेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाढीव वीज बिलाबाबत आंदोलन करण्यात आले व लॉक डाउन काळातील पूर्ण वीजबिल माफ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. प्रसंगी खा. रक्षाताई खडसे, डॉ. राजेंद्र फडके ,अशोक कांडेलकर, जि.प. सभापति जयपाल बोदडे, पं.स. सभापती प्रल्हा द जंगले , जि.प.सदस्य निलेश पाटील ,वनिता गवळे, वैशाली तायडे, पं.स. उपसभापती विद्या पाटील, नगराध्यक्ष नजमा तडवी, उपनगराध्यक्ष मनीषा पाटील , पं. स. सदस्य विकास पाटील, राजेंद्र सवळे, शुभांगी भोलाणे, सुवर्णा साळुंखे, ता.उपाध्यक्ष मनोज महाजन, विनायक पाटील ,वासुदेव बढे, ता.चिटणीस कैलास वंजारी, दत्ता पाटील ,अंकुश चौधरी , नगरसेवक ललित महाजन, पियुष महाजन, बबलू कोळी ,मुकेश वानखेडे, चंद्रकांत भोलाने, विक्रम हिरोळे व भाजपाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते