मुक्ताईनगरला पीएसआय निलेश साळुंके यांची दबंग कार्यवाही !

0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी):- मुक्ताईनगर येथील परिवर्तन चौकात कोरोना लॉकडाऊन दरम्यान व संचारबंदीत पीएसआय निलेश सोळुंके व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांनी  वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करून दंड वसूल केला आहे.

कोरोना विषाणू व्हायरस रोखणे कामे संपूर्ण देशात लॉक डाऊन केले असून संचारबंदी लागू आहे. यादरम्यान विनाकारण कोणीही वाहन चालक रस्त्यावर फिरू नये लॉक डाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून मुक्ताईनगर शहरातील परिवर्तन चौकात पीएसआय निलेश साळुंखे व पोलीस कर्मचारी मुजेश पवार, कल्पेश आमोदकर, हवालदार श्रावण जवरे, विनोद वाघ यांनी नाकाबंदी करून टू व्हीलर ,थ्री व्हीलर, फोर व्हीलर आदी. वाहनांची तपासणी करून दबंग कायदेशीर कार्यवाही करून त्यात विनापरवाना वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे, ट्रिपल सीट बसून आवाज करून जोरात मोटरसायकल चालवणे, अशा वाहनचालकांना खाकीचा हिसका दाखवून आजपावेतो एकूण 205 लोकांवर कारवाई करून दोनशे रुपये प्रमाणे दंड वसूल केलेला आहे. सदरची कार्यवाही हे मोटार वाहन कायदा अनुसार केलेली आहे. तसेच जीवनावश्‍यक वस्तू ,भाजी-पाला,मेडीकल दुकान, दूध डेरी यांना 11 ते 5 पर्यंतची वेळ ठरवून दिलेली आहे ,पाच नंतर कोणीही रस्त्यावर विनाकारण फिरू नये म्हणून निलेश साळुंके हे लाऊड स्पीकर लावलेल्या जीप ने शहरात पेट्रोलिंग करून सूचना देतात त्यामुळे नागरिकांनाशिस्त लागलेली आहे . रोडवर गर्दी दिसून येत नाही म्हणून निलेश साळुंखे यांनी दबंग कार्यवाही केली आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा रंगत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.