मुक्ताईनगर प्रतिनिधी:- मुक्ताईनगर येथील परिवर्तन चौकात आज 14 एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती सोशल डिस्टस व तोंडाला मास्क लावून उत्साहात साजरी करण्यात आली. त्याबद्दल सविस्तर वृत्त असे की सकाळी ठीक 10 वाजता परिवर्तन चौकात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांचे पुतळ्यांना पुष्पाने, दीपाने व धुपाने मान्यवरांच्या हस्ते पूजन करून वंदन करण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभेचे नाशिक विभागीय सचिव आयु. के.वाय. सुरवाडे यांनी सामूहिक बुद्ध वंदना घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून सलामी दिली.कोरोना चा वाढता प्रभाव लक्षात घेऊन वाजंत्री वाद्याचा मिरवणूक न काढता, कोणत्याही व्याख्यानमालेचा कार्यक्रम न घेता, सोशल डिस्टन्स पाडून, तोंडाला मास्क लावून शासनाच्या नियमाला अनुसरून शांततेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सदरच्या कार्यक्रमाला डॉ.आंबेडकर नगर मधील बौद्ध उपासक, सामाजिक कार्यकर्ते, भीमसैनिक, विविध संघटनेचे पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होत.तसेच तहसीलदार श्वेता संचेती, पोलीस निरीक्षक श्री सुरेश शिंदे, समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, मा.सभापती संतोष बोदडे, मा.पोलीस पाटील मोहन मेढे, विभागीय सचिव के. वाय. सुरवाडे, दलित मित्र श्री वल्लभ चौधरी, सेक्रेटरी गोकुळ पोहेकर, वंदे मातरम् ग्रुपचे अध्यक्ष धनंजय सापधारे, संजीव पालवे निलेश मेढे ,विनोद सुरवाडे, आर के गणेश, विशाल गणेश, राजू बोदडे, रोहित गणेश, रवींद्र बोदडे, आरपीआय तालुकाध्यक्ष सुधाकर बोदडे, युवक अध्यक्ष विक्रम हिरोळे, अमर बोदडे, बापू ससाने, जगदेव इंगळे , वंचित तालुका सचिव दिलीप पोहेकर, जिल्हा प्रवक्ता ऍड विनोद इंगळे, रमेश बोदडे ,बाबुराव बोदडे, विश्वनाथ गणेश, नगरसेवक मुकेश वानखेडे ,पत्रकार सतिष गायकवाड, सुरेश बोदडे,अनिल बोदडे, रवींद्र बोदडे,गायक कुणाल बोदडे कैलास अढायके, संतोष इंगळे, बाळू मेढे,सुनील तायडे, रवी तायडे आदी समाज बांधव उपस्थित होते. मा.पोलीस पाटील मोहन मेढे यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.