मुक्ताईनगरला झाडे लावून केला वाढदिवस साजरा

0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी):– मुक्ताईनगर ला दिनांक 24 जून रोजी मा.पोलीस पाटील मोहन मेढे , आमदारांचे स्वीय साहाय्यक संतोष कोळी,  जय महाजन , स्वप्नील नाईक या मान्यवरांचे वाढदिवस असल्याने त्यांनी कोणताही गाजावाजा न करता किंवा अवांतर खर्च न करता घरगुती वातावरणात मनवुन मित्र मंडळींच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि याच मान्यवरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुक्ताईनगर येथील वंदे मातरम ग्रुप, युवाशक्ती प्रतिष्ठान व एकता ग्रुप मित्र परिवार यांनी प्रभाग क्रमांक 17 मधील हनुमान मंदिर व्यायामशाळेचे परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये कर्तव्यदक्ष  पोलीस पाटील मोहन मेढे व आमदारांचे स्वीय साहाय्यक संतोष कोळी व इतर मान्यवर यांचे हस्ते वृक्षारोपण करून पावसाळ्याच्या दिवसात विविध प्रकारची झाडे गुलमोहर ,कडुनिंब, चिंच, आंबा असे फळ झाडे सुध्दा लावली व आगळया वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला वाढदिवसानिमित्त  ,युवाशक्ती प्रतिष्ठान ,वंदे मातरम ग्रुप व मित्रपरिवार मुक्ताईनगर यांच्याद्वारे उपस्थित पंकज कोळी ,शुभम तळेले,धनंजय सापधारे,मोहन महाजन, यशवंत चौधरी ,अर्जुन कोळी,सचिन सावळे ,योगेश कोळी, जयराज भोई, नितीन सुरंगे,अफसर पिंजारी, शुभम कोळी, मयुर भोई, चेतन कोळी, श्रेयस कपले व मित्रपरिवार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.