समाधान महाजन यांचे आवाहन
शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी सुरु ; शेतकरी व शिवसैनिकां मध्ये उत्साह
भुसावळ (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्ताईनगर येथे दि १५ रोजी आयोजित भव्य शेतकरी मेळाव्याला लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भुसावळ तालुक्यात शिवसेनेच्या बैठकीत शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आगमन होत असल्याने भुसावळ तालुक्यामधून लाखों शेतकरी, शिवसैनिक, नागरिक व शिवप्रेमी उपस्थित राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
याकरीता भुसावळ तालुक्यामधुन गाठी भेटी ,बैठका सुरु असून स्वागताची जय्यत तयारी सुरु केली असून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. शनिवार रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ” भव्य शेतकरी मेळावा ” होणार असून या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेने तर्फे जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून तिनही पक्षांतर्फे बैठकांचे सत्र सुरू झालेले आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने भुसावळ तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी काहूरखेडा, मानपुर टहाकळी, हातनुर, सावतर, निभोरा, कठोरा, अंजनसोंडे, घेऊन गणवाईज बैठका घेत शेतकरी मेळाव्याला जास्तीत जास्त शेतकरी, महिला व तरुण पिढीला आणण्यासाठी नियोजन करावे याबद्दल मार्गदर्शन केले . तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रश्न सोडविण्याचे व शेतकरी मेळाव्याला लाखोंच्या संख्येने येण्याचे आवाहन केले.
या बैठकीला भुसावळ तालुका प्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे ,उपतालुका संघटक प्रकाश कोळी, गण प्रमुख किशोर कोळी तसेच भुसावळ तालुक्यातील शाखाप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.