मुक्ताईनगरच्या माजी सभापतीच्या खून प्रकरणी तिघांना अटक

0

मुक्ताईनगर – मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती तथा कुऱ्हा येथील रहिवासी डी.ओ.पाटील यांच्या निर्घृण हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पाटील हे गावातील राजकारणात वारंवार हस्तक्षेप करत असल्याच्या रागातून कुऱ्हा ग्रामपंचायत सदस्य तेजराव भास्कर पाटील आणि शेतकरी असलेला विलास रामकृष्ण महाजन याने गावातील चिकन विक्रेता सय्यद शाबीर सय्यद शफी याला डी.ओ.पाटलांच्या हत्येसाठी अडीच लाखांत सुपारी दिली. त्याने इतर दोघांकडून ही हत्या घडवून आणली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना शनिवारी अटक केली. अजून दोघांचा शोध सुरू आहे.

गुन्ह्यातील आरोपी महाजन व पाटील यांनी डी.ओ.पाटील यांच्या हत्येची जवाबदारी सैय्यद शकीरवर सोपवली होती तर आरोपी सै.शकीरने सुपारी किलरच्या मदतीने ही हत्या घडवून आणली.त्यामुळे सुपारी किलर कुठले आहेत वा किती रुपयांची सुपारी देण्यात आली? याबाबत आरोपींच्या चौकशीत अन्य बाबी स्पष्ट होणार आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके,प्रभारी पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक कैलास भारसके, पोलिस उपनिरीक्षक नीलेश साळुंखे तसेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम,सहाय्यक निरीक्षक नाईक,उपनिरीक्षक लहारे, उपनिरीक्षक अंगद नेमाणे आदींच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.