मार्कसवादी कॅम्युनिस्ट पक्ष व आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
जळगाव :- शहरातील मू.जे महाविद्यालयात असोद्यातील मुकेश सपकाळे या 23 वर्षीय विद्यार्थ्याचा दुचाकीस धक्का लागल्याचा किरकोळ कारणावरून इच्छाराम वाघोदे याने त्याचावर चॉपरने हल्ला करून खून करण्यात आला होता. या खुन्यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या मागण्यासाठी आज (सोमवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
या आहेत मागण्या
मुकेश मधुकर सपकाळे ह्या विद्यार्थाला ठार मारणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. तसेच खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा व सरकार पक्षाकडून विशेष जिल्हा सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात यावी. तसेच एम.जे. कॉलेज महाविद्याच्या यंत्रणेवर चौकशी करून कडक कारवाई करावी तसेच जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयात सी.सी.टी.व्ही कॅमेरे सुरु करण्यात यावे. व त्याचा डायरेक्ट कॅनेकशन प्रत्येक तालुक्याच्या तसेच जिल्ह्याच्या पुलिस अधीक्षक यांच्या कंट्रोल रूम मध्ये जोडण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश नाकारला पाहिजे. तसेच गेटवरचं आपल्या नावाची एन्ट्री प्रत्येकासाठी अनिवार्य केली पाहिजे.व महाविद्यालयाचा गेट वर मेटल डिटेक्टर लावण्यात यावे. जेणेकरून विद्यार्थाजवळ जे काही असेल ते लक्षात येईल अशा मागण्याचे निवेदन अपर जिल्ह्याधिकारीं गोरक्षक गाडगीळ यांना देण्यात आले. या मोर्च्यात मार्कसवादी कॅम्युनिस्ट पक्ष व आदिवासी वाल्मिकलव्य सेना याचा सहभाग होता. हा मोर्चा वाल्मीकनगर येथून सकाळी १० वाजता काढण्यात आला होता.