पाचोरा ;– तालुक्यातील पिंपळगाव येथील भाजपाचे शहरप्रमुख मुकेश चौधरी यांनी भाजपाला रामराम ठोकून शिवसेनेत आ. किशोर पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला . यानिमित्त शिवसेना कार्यालय,पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते मुकेश चौधरी यांना भगवी शाल-रुमाल,पुष्पहार घालून त्यांचा सेनेत प्रवेशाबद्दल सत्कार केला .
यावेळी मुकेश चौधरी म्हणाले की, सामान्य लोकांची कामे होत नाहीत. जनतेचा अपेक्षाभंग झालेला आहेत. बोलयाचे एक करायचे भलतेच यामुळे मी कंटाळून जनसेवेसाठी शिवसेनेत दाखल झालेलो आहे. शिवसेनेत सामन्य शिवसैनिकाला देखील सन्मानाने वागविले जाते. म्हणून आमदार किशोर पाटील यांचे विकास कामे व नेतुत्व स्विकारून मी शिवसेनेत प्रवेश करीत आहे.
मुकेश चौधरी हे दुध डेअरी दुध उत्पादक सोसायटीचे चेअरमन पिंपळगाव शहरातील गुजर समाजचे अध्यक्ष, सहकार क्षेत्रातील अभ्यासू युवा नेतुत्व आहे. त्यामुळे त्यांच्या शिवसेना संघटना बळकटी निश्चित फायदा होईल. यावेळी उद्धव मराठे,रवी गीते,भगवान पाटील,गणेश पाटील,देविदास पाटील,राजेश पाटील, नाना वाघ,दिपक पाटील जारगाव,विजय भोई आदी मान्यवर उपस्थित होते.