जळगाव:- सामाजिक कार्यकर्त मुक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी हे सामाजिक व आरोग्य विषयक कार्यात नेहमी स्वयंस्फूर्त निरपेक्षपणे सहभागी होत रक्तदान, अवयवदान, नेत्रदान, देहदान, व्यसनमुक्ती, तंबाखूमुक्ती, कॅन्सर, कुष्ठरोग, क्षयरोग, एड्स निर्मूलन, पल्स पोलीओ, मानसिक आरोग्य आदि तसेच विविध आरोग्य शिबीरामध्ये आरोग्य यंत्रणेला सहकार्य करीत असतात.
कोरोनाच्या कठीण काळातही शारीरिक व्यंगाला न जुमानता कोरोना जनजागृती पत्रक वाटप, मास्क सॅनेटाईझर वाटप, पॉझिटीव्ह रुग्णांची भीती कमी करणे त्यांना समुपदेशन करणे, रुग्णांना वैद्यकीय सेवेचे सहकार्य आदि कार्यही तन्मयतेने करित आहेत.
जिल्ह्यात कोरोना लसीकरण कार्याला अधिक गती यावी सोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना तसेच दिव्यांग, ज्येष्ठ व शासनाच्या निर्देशानुसार ज्यांना समाविष्ट केले आहे. त्या सान्यांना लसीकरण कार्याची प्रभावी माहिती देत शंभर टक्के लसीकरणाची अंमलबजावणी व्हावी, याकरिता कोरोना लसीकरण कार्याचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर (स्टार प्रचारक) म्हणून मुकुंद गोसावी यांची जिल्हा शल्यचिकित्सक तथा नोडल ऑफिसर कोविड १९ डॉ. एन. एस. चव्हाण यांनी नुकतीच नियुक्ती केली.