लाहोर :२६/११ मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि बंदी घातलेल्या जमात-उद-दावा या संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तान कोर्टाने आज ५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. टेरर फंडिंग प्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली.
सईदला लाहोर येथून अटक करण्यात आली होती. पाकिस्तानने मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात उद दावा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद व त्याच्या 12 निकटवर्तीयांविरोधात चॅरिटीच्या माध्यमातून संपत्ती जमा करुन त्याचा वापर दहशतवादी कृत्यासाठी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र, मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हाफिज सईदवर कारवाई करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानवर दबाव टाकला होता. तसेच, काही महिन्यांपूर्वी त्याला संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्यामुळे हाफिज सईदवरील या कारवाईमुळे भारताला मोठे यश मिळाले.