मुंबई एमपीआयएम मॅरेथॉनमध्ये भुसावळचे संजू भटकर व गणसिंग पाटील धावले

0

भुसावळ (प्रतिनिधी )- 

मुंबई येथे पार पडलेल्या महाराष्ट्र पोलिस इंटरनॅशनल मॅरेथॉन 2020 मध्ये भुसावळ स्पोर्ट्स रनिंग असोसिएशनचे संजू भटकर व गणसिंग पाटील यांनी यशस्वी सहभाग नोंदविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पोलिस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच 16, 21 आणि 42 किलोमीटर या गटात महाराष्ट्र पोलिस इंटरनॅशनल मॅरेथॉन पार पडली. मुंबईतील सी.लिंक ते गेटवे ऑफ इंडिया असा मार्ग होता. पहाटे पाच वाजता या स्पर्धेस सुरुवात झाली. त्यात वीस हजार धावपटूंनी सहभाग नोंदविला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेते अक्षय कुमार, अजय देवगन, दिग्दर्शक रेमो, टायगर फर्नांडीस, ना. आदित्य ठाकरे यांची तर रेस डायरेक्टर म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांची उपस्थिती होती.

दोन्ही धावपटूंचा शिक्षण विभागातर्फे गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, इब्टाचे अध्यक्ष आर.आर. धनगर, एस.एस.अहिरे, मुख्याध्यापक अरुण धनपाल, जे.पी.सपकाळे, सुनील वानखेडे, क्रीडा संघटनेचे प्रदीप साखरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांना बिसाराचे अध्यक्ष प्रवीण फालक, डॉ.तुषार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.