लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई
मुंबईच्या सांताक्रुझ येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक थरारक घटना घडली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या विमानाजवळच पुशबॅक वाहनाने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.
Ground incident at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport, Mumbai few hours before ! Tow truck caught fire , when it was getting connected to one of the Air india's A320Neo aircraft.
No injuries or aircraft damage reported.#incident #aviation #airport #avgeek pic.twitter.com/09631fa9OE
— FL360aero (@fl360aero) January 10, 2022
657 क्रमांकाचे विमान मुंबईवरून जामनगरला निघाले होते. हे विमान रनवेवर ढकलण्यासाठी पुशबॅक वाहन आणण्यात आले. हे वाहन विमानाला जोडण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याच वेळेस विमानाच्या जवळच या पुशबॅक वाहनाने अचानक पेट घेतला.
पुशबॅक वाहनाला तात्काळ विमानापासून थोडे दूर करण्यात आले. विमान तळावरील अग्निशमन यंत्रणांनी आगीवर काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. मोठी दुर्घटना टळली असून सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.