मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला अटक

0

लोहार :- लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदला आज पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. पाकच्या पंजाब प्रांतातील दहशतवादविरोधी पथकानं हाफिजला बेड्या ठोकल्या आहे. अटकेनंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दहशतवादाविरोधात भारतानं जागतिक पातळीवर निर्माण केलेल्या दबावाचं हे यश मानलं जात आहे.

काही दिवसांपूर्वी पंजाब प्रांतातील पोलिसांनी हाफिज सईद विरोधात दहशतवादाला पैसा पुरवणे आणि आर्थिक गैरव्यवहार या आरोपांखाली एफआयआर दाखल केला होता. त्याचवेळी त्याला अटक होणार अशी चर्चा होती. हाफिजने फक्त मुंबईवरच नव्हे तर देशाच्या वेगवेगळया भागात दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. पाकिस्तानने काल भारतासाठी आपली हवाई हद्द खुली करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हाफिजच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.