Friday, August 12, 2022

मुंबईमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं ; पाच ठार

- Advertisement -

घाटकोपर दि, २८ जून २०१८

- Advertisement -

घाटकोपरमधील माणिकलाल परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या आवारात चार्टर्ड विमान कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून हे विमान उत्तर प्रदेश सरकारचे असल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दल आणि आपातकालीन पथक घटनास्थळी पोहोचले असून घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

- Advertisement -

- Advertisement -

घाटकोपर पश्चिमेत जागृती पार्क परिसरात जीवदया लेनमध्ये बांधकाम सुरु असलेल्या आवारात चार्टर्ड विमान कोसळले. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून तो व्यक्ती पादचारी होता, असे समजते. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

सुरूवातीला या इमारतीत आग लागल्याची अफवा पसरली. मात्र नंतर एक चार्टर्ड विमान कोसळल्याचं स्पष्ट झालं. या भागातून विमानतळ जवळ असून लहान हेलिकॉप्टरचं प्रशिक्षण देण्यासाठी हा मार्ग वापरला जातो. तसंच चार्टर्ड विमानांचाही हा मार्ग असल्याचं सांगण्यात येत आहे. घाटकोपरमधील सर्वोदय रुग्णालयाजवळील माणिकलाल परिसरात बांधकाम सुरू असलेल्या  इमारतीत हे विमान कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. घटनास्थळापासून जवळच हा महाविद्यालय होते, असे देखील समजते.

या परिसरात आगीच्या लाटा दिसत असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. पोलीस प्रशासन, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. विमानामध्ये किती जण होते, पायलटची स्थिती काय आहे याबाबत काही माहिती मिळालेली नाही. विमानाला आग लागलेली असल्यामुळे आतल्या परिस्थितीचा अंदाज आलेला नाही आणि विमानाची आग विझवल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. VTUPZ किंगएअर सी ९० हे या चार्टर्ड विमानाचे क्रमांक होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या