मुंबईत १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराची

0

मुंबई  :- एका १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना दक्षिण मुंबईतील परेड भागात घडली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आयपीसी आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पीडित अल्पवयीन मुलीवर एकून ३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घटना १० जून या दिवशी घडली असून हे तिघे पीडित मुलीचे शेजारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीवर शेजाऱ्याची अनेक दिवसांपासून नजर होती. पीडित मुलगी घराबाहेरल कचरा फेकण्यासाठी गेली असताना तिच्या शेजाऱ्याने तिला आपल्या घरी बोलावले. घरात या शेजाऱ्याचे आणखी दोन मित्रही उपस्थित होते. पीडित मुलगी घरात आल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार केला. त्या नंतर हे तिघेही पळून गेले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.