मुंबईत कोरोनाचे आणखी ४ रुग्ण आढळले !

0

मुंबई : देशभरातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र सध्या अव्वल स्थानी आहे. दरम्यान, मुंबईत 3 आणि नवी मुंबई एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ३७ झाली आहे. कालही पिंपरी चिंचवडमध्ये एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला होता.

दरम्यान, कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात राज्यातल्या सरकारी आणि खासगी सर्व शाळांचा समावेश आहे. येत्या 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

राज्यात कोरोना बाधितांची संख्या 37 वर

पुणे – 16

मुंबई – 8

ठाणे – 1

कल्याण- 1

नवी मुंबई –  2

पनवेल – 1

नागपूर – 4

अहमदनगर – 1

यवतमाळ -2

औरंगाबाद – 1

Leave A Reply

Your email address will not be published.