मुंबई | करोना पॉझिटिव्ह असलेल्या एका २९ वर्षीय महिलेनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु होते. १५ एप्रिलच्या मध्यरात्री या महिलेने रुग्णालयाच्या बाथरुममध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची आग्रीपाडा पोलिसांत नोंद झाली असून पुढील तपास सुरु आहे.