मुंबईच्या दबंगिरी विरुद्ध रिक्षा चालकांचा एकदिवशीय संप

0

शहर पोलिसांना निवेदन : लवकरात लवकर कारवाई व्हावी

भुसावळ :- येथील रेल्वे उत्तर भागातील केला सायडिंग जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टॉप वरील रिक्षा चालकांना दमदाटी करीत नेहमी रिक्षेचे भाडे न देता गुंडप्रवृत्तीच्या साथीदारांच्या मदतीने वारंवार त्रास देऊन धमकी देणा-या मुंबई येथील एका पोलीस कर्मचा-याच्या दबंगिरी विरुद्ध त्रस्त झालेल्या रिक्षा चालकांनी अखेर कंटाळून या पोलीस कर्मचा-यावर तात्काळ कारवाई करावी याकरिता दि.१३ मे  रोजी दुपारी मोर्चा काढून शहर पोलीस ठाण्यात निवेदन दिले. यावेळी शहर पोलीस ठाण्यासमोर यात्रेचे स्वरूप आले होते. तसेच आज संपूर्ण दिवसभर रिक्षा बंद ठेवण्यात आल्या असून या पोलीस कर्मचा-याविरुद्ध व त्याचे गुंड साथीदारांविरुद्ध लवकरात लवकर योग्य कारवाई करावी अन्याथा बेमुदत संप पुकारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

मुंबईच्या पोलीस कर्मचारी मनोज पगारे व त्यांचे कुटुंबीय तसेच सोबत असलेले गुंडप्रवृत्तीचे साथीदार यांना दिनांक ७ मे २०१९  रोजी रात्री येथील आर पीडी रोडवर रिक्षेने घरी सोडल्यानंतर रिक्षेचे भाडे मागितल्याचा राग आला व वाईट वाटले . यावेळी मनोज पगारे म्हणाले की तुम्ही आम्हाला किरकोळ कारणांवरून पैसे का मागितले समजत नाही का तुम्हाला आम्ही मुंबई पोलीस आहोत . असे म्हणून रात्री १२ वाजेला मनोज पगारे व त्यांचे गुंड साथीदार दारूच्या नशेत रिक्षा स्टॉपवर आले यावेळी त्यांनी आम्ही तुमच्या रिक्षा फोडून वा जाळून टाकू व तुम्हाला मारू अश्या धमक्या दिल्या. व उध्दट व उर्मट पणाची वागणूक दिली याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती . मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही त्यामुळे त्यांची हिम्मत पुन्हा वाढली व दिनांक १२ मे  रोजी रात्री २ . ३० वाजेच्या सुमारास सागर पगारे व त्यांचे गुंड प्रवृत्तीचे साथीदार चाकू लोखंडी पाईप हॉकी स्टिक घेऊन मोटारसायकलींवर रिक्षा स्टॉप वर आले आणि साले मादरचोद हरामखोर कोणी तक्रार केली सांगा , आमचा हिसका दाखवितो असे म्हणून त्यांनी धक्का बुक्की केली . कोणालाही नंबर वर बसू न देता घरी पळवून लावले. हा सर्व प्रकार रेल्वेच्या सीसी कॅमे-यात कैद झाला असून याचा पुरावा म्हणून चौकशी करिता घ्यावा .मनोज पगारे , व सागर पगारे व त्यांचे ७ ते ८ आडदांड गुंड लोक भुसावळ मध्ये जास्त अतिशय धुमाकूळ घातला . खुले आम हॉकी स्टिक घेऊन  दहशत निर्माण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत आहे.

या प्रकाराची दखल तेव्हाच घेतली गेली नाही . अन्याथा आज ही वेळ पुन्हा आली नसती .मुंबई पोलीस कर्मचारी मनोज पगारे व सागर पगारे यांचेसह त्या गुंडप्रवृत्तीच्या लोंकां कडून आमच्या जीवासह मालमत्तेस धोका आहे . यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका आहे . तेढ निर्माण करण्याची यांची प्रवृत्त्ती असून या सर्वांविरुद्ध त्वरित कारवाई करावी अन्याथा होणा-या परिणामास प्रशासन जबाबदार राहील . येत्त्या ७ दिवसाचे आत न्याय  अन्याथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल . असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे . निवेदनावर नितीन धावेश्वर , शैलेंद्र अहिरे, दीपंकार वाघ , संजय भालेराव , आबिद अली , अख्तर खान , संतोष ढोकळ , रवींद्र म्हस्के यांचेसह ५० ते ६० रिक्षा चालकांच्या स्वाक्षरी आहेत.

रिक्षा बंदमुळे प्रवाश्यांसह नागरिकांचे हाल 

१२ मे  रोजी रात्री पुन्हा पो कॉ  मंनोज पगारे व सागर पगारे यांचेसह सात आठ गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी घातलेल्या धिंगाण्या मुळे भीती पोटी रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे .पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करावी.अन्यथा बवेमुदत संप करण्यात येईल या इशा-यामुळे आजच डॉ बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टॉप अचानक बंद ठेवल्याने रेल्वे प्रवाश्यानासह नागरिकांचे प्रचंड हाल झाले .भर उन्हात त्यांना रिक्षा करिता पायपिट सहन करावी लागली .व यापुढे बेमुदत बंद म्हटल्याने नागरिकांना कोणत्या  परिस्थितीला तोड द्यावे लागणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.